Dehuroad : बेकायदेशीरपणे कत्तल करत मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : बेकायदेशीरपणे (Dehuroad) म्हशीची कत्तल करत मांस वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) देहुरोड जवळील मामुर्डी येथे घडला आहे.

हसन मोहमद कुरेशी (वय 62 रा. मामुर्डी), ईरफान हसन कुरेशी, रिक्षा चालक शाकीर अहमद सय्यद (वय 35 रा.देहुरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन व त्याचा मुलगा ईरफान हे कोणताही परवाना नसताना कत्तलीचा व्यवसाय करत होते. तर शाकीर हा त्यांनी कत्तल केलेल्या म्हशीच्या मांसाची वाहतूक करत होता. या प्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल केला असून सीआरपीसी 41(अ) (1) नुसार त्यांना नोटीस बजावली आहे. देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

PCMC : रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.