Dighi : दिघीमध्ये एसटी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दिघी येथे आळंदी-पुणे रस्त्यावर महामंडळाच्या (Dighi) बसच्या धडकेत 77 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 26) सकाळी झाला.

शांताबाई शिवराम सालपे (वय 77) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. बसचालक ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (वय 37, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Pimpri : ‘मिशन 2025’ शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवेल – विश्वास पाठक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मानलेली आई शांताबाई सालपे या दत्तनगर, दिघी येथे आळंदी-पुणे मार्गावरून जात होत्या. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना शांताबाई सालपे यांना (Dighi) चालक ज्ञानेश्वर सूर्यवंशी याच्या बसने धडक दिली. बस आळंदीकडून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. दिघी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.