Mamurdi : होम लोन गुंतवले टास्कमध्ये; इंजिनियरची 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तेल ही गेले तूप ही गेले म्हणत (Mamurdi) एका इंजिनियर होम लोन ची चक्क 35 लाखांची रक्कम ऑनलाईन टास्कमध्ये गमावली आहे. फसवणुकीचा हा प्रकार मामुर्डी, देहूरोड येथे4 डिसेंबर 2022 ते 17 मार्च 2023 या कालवधीत घडला.

सुनीलकुमार दिनेशकुमार यादव (वय 36, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 26) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कायरा संजय विक्रम आणि कस्टमर केअरवरील अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीलकुमार यादव हे अभियंता आहेत. त्यांनी घरासाठी कर्ज घेतले होते. त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात होती. दरम्यान, फिर्यादीच्या टेलिग्राम अकाउंटवर आरोपींनी मेसेज पाठवला. मुव्हीचा रिव्ह्यु टास्क दिला. त्यासाठी सुरवातीला फिर्यादीला बक्षीस दिले.

Dighi : दिघीमध्ये एसटी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘टास्क’साठी आणखी पैसे गुंतवण्यास सांगून फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक करून 35 लाख 31 हजार रुपयांचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.