Mamurdi : सेवा सुविधा व कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी बिल्डरसह दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- बिल्डिंगच्या कामाचा दर्जा सुधारण (Mamurdi )देण्यासाठी व सुरक्षा देण्याचे काम बिल्डरकडे देण्यात आले होते मात्र या संदर्भात कोणत्याही सेवा सुविधा न देत घराचे कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी बिल्डरसह दहा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असारा प्रकार नोव्हेंबर 2015 पासून ते आज पर्यंत लोटस पिनॅकल साईनगर , मामुर्डी येथे घडला आहे.

याप्रकरणी लोटस पेनॅकलचे रहिवासी राजू (Mamurdi)आकाराम पाटील (वय 46 ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून बाळासाहेब जयवंत तरस, पराग प्रमोद कुलकर्णी, विक्रम राठोड, प्रकाश बळवंत राऊत l, नवनाथ पांडुरंग राऊत, विकास भिमराव पाटील, दोन महिला आरोपी ,प्रवीण बळवंत राऊत, नितीन पांडुरंग राऊत व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : उद्यानांची दुरावस्था, अधिका-यांचे दुर्लक्ष – खासदार श्रीरंग बारणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तसेच लोटस पिनॅकल साईनगर येथील रहिवाशांनी आरोपींना बिल्डिंगचे कामकाजाचा दर्जा सुधारून देण्यासाठी व सुरक्षा देऊन बिल्डिंगचे कामकाज पूर्ण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होत. यासाठी वीस ते पंचवीस मीटिंग देखील फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये झाल्या होत्या.

 

दरम्यान बिल्डरने या कामाचे संपूर्ण पैसे फिर्यादी व इतर रहिवाशांकडून घेतले होते. मात्र अद्यापही बिल्डिंगच्या विविध सोयी सुविधा लाईट मीटर सुरक्षा याबाबत कोणतेही काम पूर्ण न करता तसेच पैसे घेऊन ही फ्लॅटच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपासणी रोड पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.