Entertainment News : ‘बॅक टू स्कूल’चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित

एमपीसीन्यूज : सरकारने अनलॉक घोषणा केली आणि सगळ्यांना नवा हुरूप आला. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी थांबले होते. आता अनलॉकमुळे सर्व नवीन चित्रपटांच्या घोषणा आणि पूर्ण चित्रपटांचे प्रदर्शन हळूहळू सुरू होत आहे. त्यातल्याच एक मराठी सिनेमा म्हणजे ‘बॅक टू स्कूल’ या नवीन चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकते सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

या चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा नावाप्रमाणे सर्व प्रेक्षकांना त्यांच्या शालेय दिवसात घेऊन जाणार आहे, हे मात्र नक्की.

प्रत्येक जण त्याच्या शालेय जीवनात अनेक अविस्मरणीय गोष्टी करत असतो. त्याच आठवणींना पुन्हा ताजे करण्यासाठी बॅक टू स्कूल हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रंग संसार प्रॉडक्शनच्या बॅक टू स्कूल या सिनेमाचे दिग्दर्शन सतीश महादू फुगे यांनी केले आहे. पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिं

ग संस्कार प्रोडक्शन हाऊसने यापूर्वी ‘रामप्रहर’ नावाचा सिनेमा केला असून तो 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.