Entertainment News : रोहित शेट्टी घेऊन येत आहे ‘खतरों के खिलाडी सिझन 13’

एमपीसी न्यूज – कलर्स टीव्हीवरील (Entertainment News) सुप्रसिद्ध शो खतरों के खिलाडीचा सिझन 13 या शनिवारपासून (दि 15) 14 स्पर्धकांसह प्रीमियर करण्यासाठी सज्ज आहे. ऍक्शन चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टीने या कार्यक्रमाचे आठव्यांदा यजमानपद स्वीकारले असून यावर्षी कार्यक्रम साऊथ आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये होणार आहे.

हा शो रात्री 9 वाजता वूट व जिओ सिनेमावर प्रसारित होणार असून तो कलर्स टीव्हीवर देखील उपलब्ध असेल. रोहित शेट्टी एका स्टंटसह शोमध्ये प्रवेश करणार असून एका हेलिकॉप्टरद्वारे स्वतःची भव्य एंट्री करणार आहे.

खतरों के खिलाडी 13 मध्ये यावेळी काही दिग्गज चॅलेंजर म्हणून दिसणार आहेत. त्यामध्ये सूत्राप्रमाणे दिव्यांका त्रिपाठी आणि हिना खान केपटाऊनला गेल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड; शिवम दुबे, रिंकू सिंह यांनाही संधी

स्पर्धक म्हणून अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. यामध्ये डेझी शाह, डिनो जेम्स, न्यारा बॅनर्जी, रश्मीत कौर, रोहित रॉय, रुही चतुर्वेदी, शीझान खान, शिव ठाकरे, साउंडस मौफक, ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, अर्चना गौतम, अरिजित तनेजा अश्या लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार आणि सोशल मीडिया प्रभावकांचा यावर्षी समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.