Talegaon : तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून

एमपीसी न्यूज – पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गालगत जवळ आढे (ता.मावळ) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाचा वायर सारख्या वस्तूने गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला.

खुनाचा हा प्रकार गुरुवारी (5 जुलै) सायंकाळी उघडकीस आला. प्रकाश कोंडीबा निहाळ (वय 25 वर्षे, रा. चनेगाव, ता. बदनापूर, जि.जालना ,सद्या रा. धायरी ,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.या संदर्भात गजानन बाबुराव शिंदे (रा. विश्वेश्वर बिल्डींग, विठ्ठल संगम सोसायटी ,धायरी ,पुणे 49)यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या खुनामुळे परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश निहाळ यांचा वायरसारख्या वस्तूने अज्ञाताने गळा आवळून खून केला.पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने एक्सप्रेस हायवेच्या ब्रिजवरून मृतदेह आढे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकून दिला.  पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.