Wakad : डेंगीचे दोन रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज – वाकड येथील शेख वस्तीत राहणाऱ्या दोघी आजी नातीला डेंगीची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्या दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्या तीन दिवसापासून या दोघीही आजारी होत्या. त्यांना चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डेंगू झाल्याचे समजले. शेख वस्तीत जागोजागी चेंबर तुंबले असून त्यामुळे मैलामिश्रित पाणी साठते तसेच येथील अनेक भाडेकरू उघडयावर कचरा टाकतात त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरून नागरिक आजारी पडत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे माझ्या आईला आणि मुलीला डेंग्यू झाला असल्याचा आरोप शाहिद शेख यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.