Bhosari : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण

एमपीसी न्यूज – पार्क केलेली गाडी काढ म्हणत बेकायदेशीर जमाव जमवत पाच जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. हा प्रकार भोसरी (Bhosari) येथे 30 जून रोजी रात्री उशीरा घडला.

Pimpri : मोकाच्या गुन्ह्यात फरार गुन्हेगारास अटक

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जय सुधिर चव्हाण (वय 21), पवन सुधिर चव्हाण (वय 20), सुधिर प्रकाश चव्हाण (वय 50, सर्व रा. भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह घाऱ्या व सिद्धार्थ वारले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कार पार्क केलेली असताना पवन तेथे आला व त्याने फिर्यादीच्या मुलाला गाडी काढण्यास सांगितले. यावेळी फिर्यादीचे पती गाडी काढत असतानाही आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.

यावेळी शिवीगाळ का करतो असे विचारले असता आरोपीने इतर आरोपींना जमा केले व लोखंडी पाईप, रॉडने, लाथाबुक्क्यांनी फिर्यादी, त्यांचे पती व दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. तसेच तुम्ही कुठे ही भेटलात तरी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. भोसरी (Bhosari ) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.