Pimpri : मोकाच्या गुन्ह्यात फरार गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज – संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोका) अन्वये कारवाई झालेला सराईत गुन्हेगार अमित भुरेलाल सौदे (वय 25, रा. पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. तो दोन वर्षांपासून फरार होता.

Pimpri : वाहन चोरी आणि विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सराईतांना अटक; दहा गुन्हे उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मागील दोन वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपी अमित सैद हा त्याच्या घरी घरच्यांना भेटायला येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी बौद्धनगर येथे सापळा रचला.

तो घरी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. मात्र तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही कामगिरी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, शाकिर जिनेडी, पोलीस अंमलदार राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, ओंकार बंड, पोलीस शिपाई समिर ढवळे, दत्ताजी कवठेकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.