Pune News : वडगाव रासाई येथे वन विभाग व फियाट इंडिया उभारणार पर्यटन केंद्र

एमपीसी न्यूज :  शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई (Pune News) या गावी वन विभाग व फियाट इंडिया पर्यटन केंद्राची उभारणी करत आहे. हे गाव शिरूर पासून 40 किलोमीटर दूर असून भीमा नदीच्या काठावर वसले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की, या गावामध्ये वन विभागाची 100 हेक्टर जमीन आहे. त्यातील 60 हेक्टर क्षेत्रावर हे केंद्र उभारले जाणार आहे. हे क्षेत्र भीमा नदीच्या काठावर आहे. पहिल्या टप्प्यात 4 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या ठिकाणी असलेल्या काटेरी, बाभळी झाडांना काढुन त्या ठिकाणी देशी जातींचे फळ, फुल व औषधी झाडे लावण्यात येत आहेत. या झाडांमुळे येथे प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणात राहण्यास येतील. त्यामुळे हे एक पर्यटन केंद्र बनेल.

PCMC Election : महापालिका निवडणूक आता एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता

म्हसेकर म्हणाले की हे केंद्र विकसित करण्याचा सर्व खर्च फियाट इंडिया करणार आहे. येथे 7 डिसेंबर रोजी वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली होती. (Pune News) प्रसिद्ध अभिनेते व देवराई फाउंडेशनचे प्रमुख सयाजी शिंदे, शिरूरचे आमदार अशोक पवार, जुन्नर विभागाचे उप वन संरक्षक अमोल सातपुते, वन विभागाचे अधिकारी, फियात इंडिया चे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आता पर्यंत सुमारे 6,000 रोपे लावण्यात आली आहेत. 15 – 16 डिसेंबर पर्यंत एकूण 10,000 रोपे या 4 हेक्टर जागेवर लावण्यात येतील.

वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा, आवळा अशा एकूण 35 देशी जातींच्या झाडांचे रोपे लावली जाणार आहेत. या रोपांना ड्रीप इर्रीगेशन पद्धीतीने पाणी देण्यात येणार आहे. यामुळे येथे विविध प्रकारचे पक्षी राहण्यास येतील. त्यामुळे हे एक पर्यटन केंद्र होईल. यापुढे 10 हेक्टर जागेवर प्रत्येक टप्प्यात वृक्षारोपण करून त्याचा विकास करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.