Alandi : सलग तिसऱ्या दिवशी जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा इंद्रायणी नदी पुन्हा जलप्रदूषणा मुळे फेसाळली होती. इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते.

यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. दि.26जून ,27 जून व 28 जून  या सलग तीन दिवसात इंद्रायणी नदी पुन्हा मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणामुळे फेसाळली आहे.

Wakad : ताथवडेत डंपर खाली चिरडून मजूर गंभीर जखमी


पंढरपूर मधील विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर  वारकरी भाविक आळंदी मध्ये माऊलींच्या दर्शनास येतात. तसेच ते पवित्र इंद्रायणी नदीमध्ये ही स्नान करतात.या जलप्रदूषणा मुळे त्यांना त्वचारोग उदभवू शकतात. आरोग्य ही धोक्यात येऊ शकते.
याची दखल प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. इंद्रायणी नदीचे हे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलावे अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थ व इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

  https://youtu.be/q72qD96HY9k

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.