Fort Competition Bhosari : चिमुकल्या शिल्पकारांनी बनविले किल्ले; 265 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Fort Compition Bhosri) असामान्य कर्तुत्व आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानला जाणारा रायगड समुद्रात असलेला जंजिरा किल्ला, शिवनेरी, प्रतापगड असे विविध प्रकारचे किल्ले आपल्या कल्पक बुद्धीने चिमुकल्यांनी इंद्रायणीनगर भोसरी  येथे साकारले. 

इंद्रायणीनगर येथील श्री साई चौक मित्र मंडळ व श्री विलासभाऊ मडिगेरी मित्र मंडळ, वैष्णव माता मंदिर समिती यांच्या वतीने ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चार ते सहा नोव्हेंबर या दरम्यान या स्पर्धा होत आहेत. स्पर्धांचे दोन गट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पंधरा वर्षापर्यंत छोटा गट व पंधरा वर्षांपुढील मोठा गट निश्चित करण्यात आले आहेत. या दोन्ही गटामधून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येणार आहे.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.गेल्या वर्षापासून ही स्पर्धा भरवण्यात येत आहे. गेल्या वर्षी तीस किल्ले म्हणजे (एका गटात 5 जण) स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यंदा 53 किल्ले बनविण्यासाठी 265 मुलांचे सहभाग स्पर्धकांचा किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग आहे. मंडळाचे खजिनदार किरणकुमार करंडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा गेल्या वर्षापासून भरविण्यात येत असल्याचे मुख्य संयोजक विलास मडिगेरी (Fort Compition Bhosri) यांनी सांगितले.

World Para Badminton Championships : सुकांतचे ब्राँझ पदकावर समाधान!

किल्ल्यांसाठी खास ॲपमधून माहिती

‘किल्ले बनवा’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा. शिवरायांनी उभारलेल्या गडकोट, किल्ल्यांची व्यवस्थितरित्या मुलांना माहिती व्हावी, त्याचे आकलन व्हावे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने किल्ला बनवता यावा यासाठी विलास मडिगेरी यांनी एक खास ॲपमधून मुलांना माहिती दिली. यामध्ये साडेतीनशेहून अधिक किल्ल्यांची माहिती आहे. त्यापैकी 60 किल्ले यंदाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आले. या 60 किल्ल्यांमधून या स्पर्धकांनी किल्ला बनवायचा आहे अशी अट या स्पर्धेसाठी घालण्यात आली होती. ज्यामध्ये चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रतिसाद दिला आहे.

मुलांना आपली संस्कृती, आपला इतिहास कळावा. या उद्देशाने गेल्या वर्षांपासून किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली जाते. गेल्या वर्षी कल्पक किल्ले बनवण्यात आले. यंदा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती मुलांना उपलब्ध करून दिली आहे. यातून मुले किल्ले बनवत आहेत. या स्पर्धेत दोन गट निश्चित केले आहे. मुलांना माती, विट, बारदाना, काटी, भगवा झेंडा आणि पाणी आयोजकांच्या (Fort Compition Bhosri) वतीने उपलब्ध करून दिली जाते, असे मुख्य संयोजक विलास मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.