Bhosari : इंद्रायणीनगरमधील सिंथेटिक ट्रॅक खुला

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील (Bhosari) संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडासंकुलात सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) बदलण्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरू हाेते. त्यामुळे शहरातील ऍथलेटिक्‍स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंची मोठी गैरसोय होत असल्याबाबत प्रशासनाच्या वेळाेवेळी निदर्शानास आणून दिले हाेते. अखेर एक वर्षानंतर हा ट्रॅक आज (शुक्रवार) पासून खेळाडूंसाठी खुला करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ऍथलेटिक्‍स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी शहरातील एकमेव सिंथेटिक मैदान आहे. या ठिकाणी 400 मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक आहे. अनेक वर्षांपासून ट्रॅकवर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धामुळे तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना ट्रॅक खराब झाला हाेता. वर्षभरापूर्वी जुना सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

Pune : अनुसूचित विभागावर जातीय ध्रुवीयकरण रोखण्याची फार मोठी जबाबदारी – अरविंद शिंदे

क्रीडा संकुलातील ट्रॅकवर सकाळी आणि सायंकाळी या दोन सत्रांत अनेक खेळाडू मैदानी स्पर्धेचा सराव करत हाेते. खेळाडूंना सरावासाठी ट्रॅकच उपलब्ध नसल्याने त्यांना इतर ठिकाणी सराव करावा लागत हाेता. सिंथेटिक ट्रॅकवर सराव करता न आल्याने त्याचा थेट परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत हाेता. ट्रॅकच्या कामाला विलंब झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले. शहरात 150 राज्यस्तरी खेळाडू, तर 50 राष्ट्रीय खेळाडू आहेत.

सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. साईड पट्या, लाँग जम्प आणि आऊटलेट काढणे अशी किरकाेळ कामे हाेणे बाकी आहे. मात्र, खेळाडूंची गैरसाेय हाेत असल्याने आणि ट्रॅक खुला करण्यास काेणतीही अडचण नसल्याने आज शुक्रवार (दि.15)पासून ट्रॅक खुला करण्यात येणार आहे. किरकाेळ कामेही त्वरीत पूर्ण करण्याच्या स्थापत्य विभागाला सुुचना दिल्या आहेत, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी (Bhosari) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.