Pune : अनुसूचित विभागावर जातीय ध्रुवीयकरण रोखण्याची फार मोठी जबाबदारी – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज – सध्या मोदी सरकारच्या राज्यात दलितांवर ( Pune) भारतात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दलित अत्याचारांमध्ये फार वाढ झाली असून जाती-जाती मध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप सरकार व आर.एस.एस. ची लोक करीत आहेत. त्याकरीता काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रोडवर उतरून अन्यायाच्या विरोधात लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर सध्या राज्यघटना बदलण्याची जी लोक भाषा करतात त्यांना चपराक नक्कीच बसेल. तसेच जातीय ध्रुवीय करण रोखण्याची फार मोठी जबाबदारी अनुसूचित विभागाच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

Pune : पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवे आयुक्त 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम आज काँग्रेस भवन, शिवाजीनगर पुणे येथे पार पडला. यावेळी पुणे शहरातील वडगांवशेरी, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, येरवडा, मुंढवा, घोरपडी, या भागातील विविध कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक मुख्तार शेख, अजित दरेकर, डॉ. यशराज पारखी, राजेंद्र भुतडा, रवि आरडे, हेमंत राजभोज, सुंदरा ओव्‍हाळ, शारदा वीर यांच्यासह अनेक काँग्रेसजण उपस्थित होते.

यावेळी यश कांबळे, राजेश दांडगे, मिथीलेश करोसीया, विनोद चौरे, विकास बनसोडे, अरविंद जाधव, सागर सांळुखे, अमर मंडलिक, हर्षवर्धन पवार, गणेश कांबळे आणि सनी ओव्‍हाळ आदी पदाधिकाऱ्यांना शहराच्या विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन पुण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव यांनी केले तर आभार डॉ. यशराज पारखी यांनी ( Pune) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.