Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहकांची माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

मोहिमेत नऊ गिर्यारोहकांनी सर केले 5 हजार 364 मीटर उंचीचे शिखर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri) नऊ गिर्यारोहकांची तब्बल 5 हजार 364 मीटर उंचीवर चढाई करत माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. सर्वत्र बर्फ, थंड वातावरण, जीवघेणी अवघड वळणे, खडी चढण अशा संकटांचा सामना करत भोसरी इंद्रायणीनगर येथील या नऊ गिर्यारोहकांनी 13 दिवसांची ही खडतर मोहीम फत्ते केली.

एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेस तब्बल 5 हजार 364 मीटर आणि 17 हजार 598 फूट उंचीवर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. प्रत्यक्षात माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नेपाळ काठमांडून मार्गे या ठिकाणी पोहोचता येते. वर्षातून फक्त चार महिने ही मोहीम गिर्यारोहकांना करता येते.

भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरातील गिर्यारोहक मयुरेश धनंजय जाधव, नेहा मुयरेश जाधव, ऐश्वर्या विलास मडिगेरी, प्रसाद पितांबर वाघमारे, कुणाल रमेश पवार, कुशांग चेतन ढोलकिया, संचिता दिनेश लाहोट, रचना अश्विन शहा आणि चिरायू अश्विन शहा यांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

मोहिमेत एका बाजुने 62 किमी, तर दोन्ही बाजूने हे अंतर 124 किमी चालत पार केले. दररोज ते 30 हजार पावले चालत त्यांनी (Pimpri) हा खडतर प्रवास पूर्ण केला. ते सर्व 30 सप्टेंबरला 2023 काठमांडूला पोहोचले. 1 ऑक्टोबरला त्यांनी चढाईला सुरुवात केली आणि 12 ऑक्टोबरला हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला.

गिर्यारोहक मयुरेश जाधव म्हणाले की, “संयम, दृढनिश्चय आणि सहनशक्तीच्या जोरावर केलेल्या मोहीमेत आश्चर्यकारक, चित्तथरारक आणि अनोख्या संस्कृतीचा अनुभव मिळाला. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी सराव आवश्यक आहे. त्यासाठी गरजेचा आहे. मोहिमेपूर्वी तीन महिने सलग सराव केला. त्या करिता महाराष्ट्रातील राजगड, सिंहगड, कळसुबाई शिखर, आंदरबन जंगल, भिमाशंकर जंगल, हरिशचंद्र गड येथे ट्रेक केले. सरावामुळे माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पची ही खतर मोहीम आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो.

Pune : रस्ता रुंदीकरणाच्या कामात 36 वीजवाहिन्या तोडल्या, पेठांसह शिवाजीनगरमधील 19 हजार वीज ग्राहकांची वीज खंडीत

मोहिमेबद्दल सांगताना गिर्यारोहक ऐश्वर्या विलास मडिगेरी म्हणाल्या की, “ही मोहिम पूर्ण करण्यासाठी आम्ही जस जसे वर चढाई करत होतो. तसे तसे ऑक्सिजन पातळी कमी आणि थंडीमध्ये वाढ होऊ लागली. तापमान -5 ते 10 पेक्षाही जास्त थंडी होती.

या मोहिमेत आम्ही सर्वांनी ऊन, पाऊस आणि हिवाळा असे सगळे ऋतू अनुभवले. दररोज सहा ते आठ तासांची चढाई आम्ही पाठीवर आठ-दहा किलोचे वजन घेऊन केली. खडतर प्रवास करून केलेल्या या मोहिमेतून वेगळा अनुभव आणि आनंददायी अनुभव आम्हा सर्वांना मिळाला”. पूर्ण माउंट एव्हरेस्ट चढाई करणे इतकी सोपी गोष्ट नाही परंतु ती पूर्ण करण्याची इच्छा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.