Hinjawadi Prostitution case : वेश्या व्यवसाय प्रकरणी चौघांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज – महिलांना पैशांचे आमिष दाखवून (Hinjawadi Prostitution case) त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणा-या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेपाच वाजता बालेवाडी येथील त्रिवेणी लॉज येथे करण्यात आली.

विजय साहेबराव थोरात (वय 31, रा. बालेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. तर राज उर्फ भागवत गुंडरे, निलेश मारवाडी उर्फ राजू, युसूफ सरदार शेख उर्फ लंगडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार थोपटे यांनी हिंजवडी (Hinjawadi Prostitution case) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Amruttulya tea : चहाच्या दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरा, रोख रक्कम चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी संगणमत करून चार पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवले. त्यांना वेश्‍या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करून घेतला. तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका चालवली. याबाबात माहिती मिळाली असता पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात चार महिलांची सुटका करत घटनास्थळावरून 39 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.