Amruttulya tea : चहाच्या दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरा, रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – मोहननगर चिंचवड येथील रत्ना अमृततुल्य चहाच्या (Amruttulya tea) दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमे-याचे रेकॉर्डिंग डिव्हाईस आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. 4) पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत घडली.

दिनेश रामप्रकाश शर्मा (वय 67, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vehicle Theft News : भोसरी, निगडी, चिखलीतून 9 लाखांची वाहने चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या रत्ना अमृततुल्य चहाच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून सीसीटीव्ही (Amruttulya tea) कॅमे-याचे सहा हजार 18 रुपयांचे रेकॉर्डिंग डिव्हाईस आणि सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 13 हजार 18 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.