Vehicle Theft News : भोसरी, निगडी, चिखलीतून 9 लाखांची वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीच्या (Vehicle Theft News) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. भोसरी, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 4 जून) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शिवपूजन ब्रिजलाल गुप्ता (वय 29, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची दुचाकी त्यांच्या घरापासून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 3 जून) पहाटे उघडकीस आला.

अक्षय मोतीलाल धर्मावत (वय 32, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची 65 हजारांची इको कार भोसरी येथील राजमाता जिजाऊ ब्रिजखालून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 4 जून) सकाळी उघडकीस आला.

Chakan : चोरलेल्या मोबाईलमधील ‘फोन पे’द्वारे 99 हजार उडवले

निगडी पोलीस ठाण्यात दोन वाहन (Vehicle Theft News) चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात किरण गुलाबसिंग परदेशी (वय 52, रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 99 हजारांची इको कार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. 4 जून) मध्यरात्री चोरून नेली.

दुस-या प्रकारात बुधराम हरिहरप्रसाद सोनी (वय 52, रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 25 हजारांची दुचाकी त्यांच्या घरापासून चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 4 जून) सकाळी उघडकीस आली.

संभाजी गोपाळ यादव (वय 39, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मयत मावशी कमला खानेकर / नूरजहाँ अजीज कुरेशी यांच्या नावावर असलेली सात लाख रुपये किमतीची क्रेटा कार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना 18 एप्रिल ते 4 जून या कालावधीत घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.