Chakan : चोरलेल्या मोबाईलमधील ‘फोन पे’द्वारे 99 हजार उडवले

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्याने एका व्यक्तीचा मोबाईल फोन (Phone Pay) चोरला. त्यानंतर मोबाईल मधील फोन पे द्वारे बँक खात्यातून 99 हजार रुपये काढून चोरी केली. हा प्रकार 31 मे रोजी चाकण येथील तळेगाव चौकात घडला.

गिरीशकुमार सुभाष पाटील (वय 34, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 4 जून) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirgaon Crime News : शिरगाव येथे घरफोडी करून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 15 हजारांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरला. त्यानंतर चोरट्याने मोबाईल मधील ‘फोन पे’द्वारे (Phone Pay) फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 99 हजार रुपयांची अज्ञाताने चोरी केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.