Wakad : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने (Wakad )एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाने ज्या व्यक्तीकडून गुटखा विक्रीसाठी आणला, त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4 जून) सकाळी पावणे अकरा वाजता पडवळनगर येथे करण्यात आली.

सद्दाम अहमद रियाज (वय 24, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहूल ( संपूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मयुर वाडकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Amruttulya tea : चहाच्या दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरा, रोख रक्कम चोरीला

पोलिसांनी (Wakad) दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला वाकड येथील चाचा पान टपरीमध्ये तंबाखुजन्य गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टपरीवर छापा टाकला. त्यात 4 हजार 990 रुपयांची हुक्का फ्लेवरची पाकिटे, 14 हजार 592 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि एक मोबाईल फोन असा एकूण 27 हजार 582 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.