अनिरुद्ध गौतम यांच्याकडून हॉस्पिटलिटी क्षेत्रातील मार्केटिंग व बिझीनेसबाबत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाज पुणे चॅप्टर ने अनिरुद्ध गौतम (एस. गौतम अँड असोसिएट्स एलएलपीचे वरिष्ठ भागीदार) यांच्यासोबत नुकतेच फायनान्सिंग वर आधारित एका महत्वपुर्ण चर्चासत्राचे आयोजन केले होते. डॉटपे-संचालित हा कार्यक्रम ‘रेस्टॉरंट फायनान्स 360’ वन लाउंज, कोरेगाव पार्क येथे नुकताच संपन्न झाला ज्यामध्ये पुण्यातील 160 हून अधिक नामंकित रेस्टॉरंट्स व व्यवसायिक उपस्थित होते.

बाणेर, पुणे- भाजी पाला येथील व्हेगन लाइफस्टाइल किचनमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या त्यांच्या सदस्यांसाठीच्या पहिल्या विशेष कार्यक्रमानंतर एनआरएआय पुणे चॅप्टरने पुन्हा एकदा नॉलेज शेअरिंग सेशनद्वारे जोरदार पुनरआगमन केले व या खास चर्चासत्राद्वारे त्यांनी उद्योग- व्यवसायीकांना वित्त आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले.

Guru Tegh Bahadur Football Tournament: गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धा 9 डिसेंबरपासून सुरु

अनिरुद्ध गौतम यांनी या खास आयोजनामध्ये उपस्थित रेस्टॉरंट्स व ब्रँड्सला त्यांचे आर्थिक व्यवहार कसे हाताळावेत याविषयी मूलभूत मार्गदर्शन केले . सर्व व्यवसायीक मालकांनी कश्या प्रकारे जागरूक असले पाहिजे यावर प्रकाश टाकुन सेटअप कॉस्ट मॅनेजमेंट, बुक किपिंग डिसीप्लीन, कम्प्लायन्स, वर्किंग कॅपिटल बजेटिंग इत्यादी गुंतागुंतीच्या व्यावसायिक पैलूं बाबत मार्गदर्शन केले.

या सत्रामध्ये एनआरएआय पुणे चॅप्टरमध्ये प्रफुल्ल चंदावरकर ( मलाका स्पाईसचे मालक) ,केविन टेलीस (टॉईट), सिद्धार्थ महाडिक (ले प्लासिर), कुणाल म्हस्के (पेंटहाऊज) आणि निकी रामनानी (द डेली ऑल डे) यांच्यासह पुण्यातील इतर प्रमुख रेस्टॉरंटर्सचाही समावेश आहे.

एनआरएआए ही देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये चॅप्टरच्या स्वरूपात अस्तित्वात असलेली संस्था आहे, जी 5 लाखाहून अधिक रेस्टॉरंट्सचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांना त्यांचे ब्रँड आणि व्यवसाय एकत्रितपणे वाढविण्यात मदत करते. त्याचप्रमाणे, एनआरएआय पुणे चॅप्टर सदस्यत्वाचा विस्तार करून , अतिथींना शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी देऊन शहरात अद्वितीय समुदाय निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.