H3N2 : टेंशन वाढवलं! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला

खबरदारी घेण्याचं सरकारचं आवाहन

एमपीसी न्यूज : देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. जवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका मोठया रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.

 

महाराष्ट्रातील हा पहिला बळी असुन देशातील तिसरा मृत्यू आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत्यू युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि नगरच्या आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली.

दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता. (H3N2) नगरमधील मोठया रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करत्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती.

MPC News Podcast 15 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

मयत तरुण मुळचा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. कोविड आणि इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाल्याने नगरच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. इन्फ्लूएंझा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दरम्यान मयत तरूणासोबत आणि संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हरियाणा आणि कर्नाटक राज्यात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रात एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा पहिला व देशातील तिसरा बळी या विषाणूने घेतला. कोरोना लाटेतही राज्यात नगर हॉटस्पॉट ठरले होते.(H3N2) आता एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या नव्या विषाणूचा राज्यातील पहिला बळी नगरला गेल्याने नगरकरांना सर्तकता राहण्याची आवश्यकता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नगरमधील पहिल्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेज परिसरात मास्क सक्ती केल्याचे समजते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.