Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैल फाउंडेशनच्या वतीने मदत

एमपीसी न्यूज : आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारत देशाचा आधारस्तंभ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपल्या नाजूक परिस्थितीमुळे कोणताही होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शैल (Alandi) फाउंडेशन ही संस्था समाजातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षापासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवीत  आहे.

India News : चंद्रयान 3; भारताची सर्वात महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिम!

त्याच उद्देशाने श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील एकूण 225 होतकरू विद्यार्थ्यांना जवळपास तीन लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य त्यामध्ये पुस्तक, वह्या, बॅग, एस.एस.सी. बोर्ड परीक्षेची फी तसेच विद्यालयातील दिव्यांग विभागातील मुलींना गणित पाटी व त्यासाठी आवश्यक साहित्य इत्यादी मदत करून त्यांच्यातील आत्मविश्वासाचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

 

याप्रसंगी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित माजी शिक्षिका पार्वतीबाई चव्हाण, गणेश चव्हाण (उद्योजक), प्रवीण नाईक (शास्त्रज्ञ डिफेन्स), दिलीप टिकले (विश्वस्त, शैल फाउंडेशन), संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे आदी उपस्थित होते.

 

प्रास्ताविकामध्ये दीपक मुंगसे यांनी शैल फाउंडेशनचे कार्य याविषयी आपले विचार व्यक्त केले. नंतर दिलीप टिकले यांनी शैल फाउंडेशनच्या वतीने मिळणाऱ्या मदतीचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सदुपयोग करून मोठे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्था हिरीरीने प्रयत्न करत आहे असे विचार व्यक्त केले.

 

पार्वती चव्हाण व गणेश चव्हाण यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे जाहीर केले व विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

शेवटी सुरेश वडगावकर यांनी शैल फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामदास वहिले यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.