Hinjawadi News : लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पाठवल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पाठवल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जून 2021 रोजी शिवतेजनगर, हिंजवडी येथे घडला.

 

तबारेज खान (मोबाईल क्रमांक 9021708553) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे यांनी 21 एप्रिल 2022 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ इतरांना शेअर केले. लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ बनवणे, ते प्रसारित करणे, इतरत्र पाठवणे हा गुन्हा आहे. अशा प्रकरणांवर पोलिसांचे एक पथक कायम लक्ष ठेऊन असते. अशी बाब निदर्शनास येताच संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.