Nigdi : चिकनप्रेमींसाठी हॉटेल रागामध्ये कुक-डू-कू फेस्टिव्हल

(स्मिता जोशी)

एमपीसी न्यूज- ख-या खवय्याला चमचमीत खाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. त्यांच्यासाठी वर्षाचे बाराही महिने सण उत्सवच असतात. हे ओळखूनच प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये कुक – डू – कुक चिकन फेस्टिव्हल सुरु झाला असून चिकनची व्हरायटी खायची असेल तर हॉटेल रागाला भेट द्यायलाच हवी. आपल्याला वाटेल चिकनमध्ये असे काय विशेष असेल पण हॉटेल रागामधील एक सो एक लाजबाब डिशची चव घेतल्यावर तुम्हीदेखील म्हणाल की चिकनच्या इतक्या वैविध्यपूर्ण डिशेस मिळणार तर फक्त आणि फक्त हॉटेल रागामध्येच. भारतीय, चायनीज, कॉन्टिनेंटल, थाई चिकनच्या मस्त मस्त पाककृतींवर ताव मारायचा असेल तर लवकरात लवकर हॉटेल रागामध्ये या आणि तृप्त होऊन जा.

आपल्या जेवणाची सुरुवात करण्यासाठी क्रीम ऑफ चिकन आणि थाई चिकन सूप टेस्ट करायलाच हवे. त्यानंतर स्टार्टर्समध्ये मुर्ग पर्चे कबाब तर मस्ट ट्राय या सदरात मोडणारे. मॅरिनेट केलेल्या चिकनच्या स्लाइस आणि नंतर त्या तंदूरमध्ये खरपूस भाजलेल्या. नुसत्या वासानेच भूक खवळलीच पाहिजे. त्याशिवाय काजू आणि कांद्याच्या पेस्टमध्ये मुरवलेला चिकन चंगेझी कबाब, दोन मॅरिनेशन असलेला रान ए मुर्ग हे कबाबदेखील ऑर्डर कराच. रान ए मुर्गमध्ये चिकनला मसाला लावून चोवीस तास मुरवले जाते. त्यानंतर तंदूरमध्ये खरपूस भाजले जाते. ज्यांना चटपटीत खायला आवडते त्यांच्यासाठी खास चटपटा टिक्का आहे. आणि तवा कलेजी, ड्रॅगन चिकन स्प्रिंग रोल व फक्त लेमन आणि मिरीचा स्वाद असलेले लेमन करुन पेपर चिकनपण खाऊन पहाच.

मुख्य जेवणात रोस्ट चिकन सिझलर आहे. यात चिकनचे कटलेट नसते तर मॅरिनेट केलेले चिकनचे पीस असतात. तसेच तली मसाला मुर्गी सिझलर हे भारतीय आणि कॉन्टिनेंटल फ्युजन असलेले सिझलरदेखील खाऊन बघाच. ज्यांना थोडी स्पायसी धाबा स्टाइल चिकन करी खायची असेल त्यांनी धाबा बटर चिकन ऑर्डर करावेच. थोड्या वेगळ्या स्वादाचे देहाती चिकन, लालभडक आणि तेजतर्रार गुंटूर मिरची घालून बनवलेले गुंटूर चिकन, नारळाच्या रसातील कोझी चिकन, लेमन ग्रास, गलांगलचा स्वाद असलेले मलेशियन रेन्डांग चिकन या मुख्य जेवणातील डिशेस खाऊन पाह्यल्यावर ख-या चिकनप्रेमीची क्षुधा शांत झाल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती हॉटेल रागाचे संचालक राहुल गावडे यांनी दिली.

ज्यांना खास तिखट खायचे आहे त्यांनी चिकन क्रोपोव्ह राइस हा एक वेगळ्या चवीचा राइस ट्राय करावा असे शेफ विशाल यादव यांनी आवर्जून सांगितले. आणि चिकनचे छोटे पीसेस असलेला चिकन कुलचा पण ऑर्डर करायला हवा. त्यासोबत जरा हटके मसाला अप्पम म्हणजे भारतीय जेवण किती परिपूर्ण आहे याची प्रचिती देणाराच.

सो… लवकरात लवकर हॉटेल रागाला भेट देऊन चिकनच्या वैविध्यपूर्ण आणि लाजबाब डिशेस खाऊन तृप्त होऊनच जा.

हॉटेल रागा, 

प्राधिकरण, निगडी.

"Hotel

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.