Maharashtra News : जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजप सोबतही जाऊ शकतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज – साडेतीन वर्षांपूर्वी आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजप सोबतही जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया (Maharashtra News)  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Maharashtra News : आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला- राज ठाकरे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “देशातील आणि राज्यातील परिस्थितीचा विचार करता विकासाला महत्व देण्याचे मत सर्वांचे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात नऊ वर्षांपासून सरकार काम करत आहे. मोदी देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येक राज्यात राजकीय परिस्थितीत वेगवेगळी आहे. पश्चिम बंगाल, पंजाब आणि अन्य राज्यातही विविध पक्षांचे सरकार आहे.  शुक्रवारी मी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी माझी भूमिका सर्वांसमोर स्पष्टपणे मांडली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. पुढेही पक्ष म्हणूनच पुढे जाऊ. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घेऊन पुढील सर्व निवडणुका लढवू. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात अन्य सहकाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

आमच्याकडे जे विभाग येतील त्यात सर्वस्व पणाला लाऊन कामाला सुरुवात करणार. पुढील दोन दिवसात खात्यांचे वाटप होईल. विभागीय स्तरावर नवीन कार्यकर्ते पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजप सोबतही जाऊ शकतो. आता काहीजण परदेशात आहेत. काहीजण आज रात्रीपर्यंत पोहोचतील. त्या सर्व सहकार्यांच्या विचाराने हा निर्णय घेतला असल्याचेही पवार म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी म्हणूनच सहभागी झालो आहोत. आपल्याला सकारात्मक पणे काम करणे गरजेचे आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.