NCP : शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, मावळचे आमदार सुनील शेळके हे अजितदादांसोबत

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळचे आमदार सुनील शेळके हे दोघे राजभवनात झालेल्या अजित पवार यांच्यासह 9 आमदारांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे दोघेही पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra News : जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजप सोबतही जाऊ शकतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Talegaon Dabhade

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)  फूट पडली आहे. शरद पवार यांचा पुणे जिल्हा असलेल्या शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

अमोल कोल्हे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. 2019 मध्ये शिरूरमधून लोकसभेत निवडून गेले होते. मागील काही महिने कोल्हे यांचे अजित पवार यांच्यासोबत बिनसले असल्याची चर्चा होती. पण, अजित पवार यांच्या शपथविधिवेळी कोल्हे उपस्थित होते. तसेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत  आमदार झालेले सुनील शेळके हे देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे शेळके हे देखील अजितदादांसोबत असल्याचे दिसते.

शपथविधीपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील आणि आमदार सुनील शेळके हे भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करताना दिसले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.