Chikhali : वाहनांची तोडफोड व लुटमार करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – चिखलीत

(Chikhali) गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने केली.

NCP : शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, मावळचे आमदार सुनील शेळके हे अजितदादांसोबत

आदर्श गौतम खंडारे (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शवप्पा काशिनाथ अरवत्तु (वय 25, रा. जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पो मध्ये (एमएच14/केए 5746) झोपले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी दगडाने व कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्या. फिर्यादीवर जिवघेणा हल्ला करत जबर जखमी केले. तसेच सुभाष दिगंबर भोसले (वय 52) हे त्यांच्या बस (एमएच 14/सीडब्ल्यू 2906) मध्ये असताना त्यांच्याही गाडीच्या काचा फोडून त्यांना हाताने मारहाण करत खिशातील 200 रुपये आरोपींनी हिसकावून नेले.

गुन्हे शाखेने तिघांना पकडले असून त्यांना पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.