Bhosri : आयएमए भोसरी शाखेतर्फे दुर्गा टेकडी प्राधिकरण येथे सिपीआरचे प्रात्यक्षिक

एमपीसी न्यूज : दरवर्षी 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉ दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (Bhosri) शाखेतर्फे दुर्गा टेकडी प्राधिकरण येथे स 6 ते 8.30 या वेळात CPR म्हणजेच हृदय क्रिया बंद पडल्यावर दिल्या जाणाऱ्या प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले.

Chikhali : वाहनांची तोडफोड व लुटमार करणाऱ्यास अटक

 

त्यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. या करिता डॉ माया भालेराव, डॉ भावेश शेठ यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. डॉ लक्ष्मण गोफणे MOH YCMH व डॉ अभय गादेवार DY MOH YCMH हे उपस्थित होते.

 

IMA चे अध्यक्ष डॉ सुशील मुथियान, सचिव डॉ अनिरुध्द टोणगावकर, खजिनदार डॉ विकास मंडलेचा, patron डॉ दिलीप कामत सर, डॉ ललित धोका, डॉ सुहास लुंकड, डॉ सुधीर भालेराव यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

 

संध्याकाळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम BOLLYWOOD NITE निगडी येथील ग दि माडगुळकर सभागृह येथे IMA सभासद व त्यांच्या परिवाराकरिता आयोजित केला होता. सुमारे 200 डॉनी आपल्यातील संगीत, नृत्य, संवाद, अभिनय अशा विविध गुणाचे सादरीकरण केले.

 

डॉ संजीवकुमार पाटील, डॉ सुमेध अंदुरकर, डॉ दीपाली टोणगावाकर, डॉ रुपाली चौधरी यांचा यात विशेष सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.