Pimpri : इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ. सुशील मुथियान

एमपीसी न्यूज : इंडियन मेडिकल असोसएशनच्या (Pimpri) पिंपरी चिंचवड भोसरीच्या (पीसीबी) अध्यक्षपदी डॉ. सुशील मुथियान तर सचिवपदी डॉ. अनिरुद्ध टोनगावकर यांची निवड करण्यात आली.

बालेवाडी येथे संपन्न झालेल्या या पदग्रहण सोहळ्यास आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अगरवाल, उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. मंगेश पाटे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, मावळते अध्यक्ष डॉ. विजय सातव, सचिव हेमंत पाटील, डॉ. दिलीप कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अगरवाल यांनी राबवलेल्या ‘आओ गांव चले’ या मोहिमेच्या अंतर्गत डॉ. मुथियान यांनी मावळ येथील गोडूंब्रे हे गाव शैक्षणिक व वैद्यकीय सेवेकरीता दत्तक घेतल्याची माहिती दिली. येथे वाचनालय उभारणीचे काम प्रथम करण्यात येणार आहे. या गावच्या सरपंच निशा गणेश सावंत या देखील यावेळी उपस्थित (Pimpri) होत्या.

Pimpri : नेपाळमधील अल्पवयीन दोन मुलांनी लग्नासाठी गाठले भारत; पोलिसांच्या समजुतीने मुलगी परतणार मायदेशी

नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे-

डॉ. सुशील मुथियान – अध्यक्ष
डॉ.अनिरुद्ध टोणगावकर – सचिव
डॉ. सुहास लुंकड – (सहसचिव)
डॉ. विकास मंडलेचा – (खजिनदार)
डॉ. माया भालेराव -(नियोजित अध्यक्ष)
डॉ. सुधीर भालेराव –
डॉ.ललित धोका( दोघेही उपाध्यक्ष)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.