Pimpri : नेपाळमधील अल्पवयीन दोन मुलांनी लग्नासाठी गाठले भारत; पोलिसांच्या समजुतीने मुलगी परतणार मायदेशी

एमपीसी न्यूज : भारत आणि नेपाळमधील दोन (Pimpri)  अल्पवयीन मुलांचे प्रेम प्रकरण समोर आले असून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पिंपरी पोलिसांच्या मदतीने ही दोन्ही मुले सापडली असून यातील मुलगी आपल्या मायदेशी परतण्यास तयार झाली आहे. या प्रकरणाने भारत आणि नेपाळ येथील पोलिस या दोघांचा शोध घेत होती. 

नेपाळमधील 14 वर्षीय नेहा आणि एकोणविस वर्षीय नकुल हे लग्न करण्यासाठी भारतात पळून आले. नेहा बेपत्ता असल्याने तिच्या वडिलांनी नेपाळमधील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुढे तिच्या वडिलांना नेहाचे नकुलसोबत प्रेम प्रकरण असल्याचे समजले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या दरम्यान नकुल देखील बेपत्ता असल्याचे समजले. दोघांचे फोन रेकॉर्ड चेक केले असता ते भारतातील पिंपरी चिंचवड येथील नकुलच्या बहीणीकडे असल्याची माहिती मिळाली.

Pimpri : जॅकवेल निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आयुक्तांना घेराव

त्यानंतर दिल्लीस्थित अधिकाऱ्यांनी नेहाच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलीस प्रमुख आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली. नकुलने तिचे अपहरण केले नसून ती त्याच्यासोबत स्वखुशीने भारतात आल्याचे नेहाने अधिकाऱ्यांना सांगितले. तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली, परंतु भारतीय कायद्यानुसार लग्न करण्यासाठी मुलगी 18 आणि मुलगा 21 वर्षांचा असणे आवश्यक आहे.

त्यामुळे नेहा नेपाळला परतण्यास तयार झाली. अधिकाऱ्यांनी (Pimpri) खात्री केली की नकुलचे वय 18 पेक्षा कमी नाही. नेहा नेपाळला परत जाईपर्यंत नकुलला पिंपरी पोलीस ठाण्यात दररोज हजर राहणे आवश्यक आहे.

नेहाला परत घेण्यासाठी नेपाळमधील एका सामाजिक संस्थेचे अधिकारी येत्या काही दिवसांत भारतात येणार असून, तिला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.