Pimpri : जॅकवेल निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आयुक्तांना घेराव

एमपीसी न्यूज – गली गली मे शोर है, भाजप सरकार चोर है, वाटून खा लाटून खा, चाटून खा, भ्रष्ट महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, भ्रष्टाचारी प्रशासनाचे करायचे काय, (Pimpri) खाली डोके वर पाय, जॅकेवल निविदेत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, महापालिका आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, रद्द करा रद्द करा जॅकवेल निविदा रद्द करा अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवारी) आयुक्त दालनासमोर आंदोलन केले. सुमारे तासभरापासून हे आंदोलन चालू होते.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जॅकवेलच्या वादग्रस्त निविदेला 29 मार्च रोजी मान्यता दिली. भामा आसखेड धरणाजवळ मौजे वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे, त्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस, अॅप्रोच ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत यांत्रिकी, स्काडासह इतर अनुषंगिक कामाच्या या वादग्रस्त निविदेला मान्यता दिली. गोंडवाना इंजिनिअर्स या ठेकेदाराला 176 कोटी 42 लाख रुपयांना हे काम दिले आहे.

Pune : कचरा उचलण्यासाठी हायड्रोलिक प्रणाली असलेली नवीन वाहने तैनात

ही निविदा रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी श्याम लांडे, (Pimpri) राहुल भोसले, नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेविका माया बारणे, संगीता ताम्हाणे आदी सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.