Maval : मावळातील सहा साकव पुलांसाठी दोन कोटी 60 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – आढले बु.,कोथुर्णे, पाचाणे आगळे वस्ती, पाचाणे खिलारेवस्ती,बेबडओहोळ, खडकवाडी या (Maval) सहा ठिकाणी साकव पुल बांधण्यासाठी दोन कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.या साकव पुलांमुळे अनेक गावांमधील दळणवळणासाठी चांगली सोय उपलब्ध होणार आहे.मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत हा निधी मिळाला असल्याने नागरिकांकडून शेळके यांचे आभार मानले जात आहेत.

मावळ मतदारसंघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्यांवरही विकासकामे पोहोचवण्याचे कार्य आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे. तालुक्यातील सहा साकव पुल बांधण्यासाठी दोन कोटी 60 लक्ष निधी आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील छोटे ओढे,नाले अशा ठिकाणी वाड्या-वस्त्यांना मुख्य गावाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर पुल नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती.ही अडचण ओळखून आमदार शेळके यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सहा साकव पुल नव्याने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे.

Pune : 350 किमीचा प्रवास, 600 सिसिटीव्ही फुटेज! येमेन नागरिकांना लुटणाऱ्या गँगला पुणे पोलिसांनी केली अटक

यामध्ये 35 लक्ष निधीमधून आढले बु.येथे भगतवस्ती ते डोणे रस्त्यावर साकव बांधणे,60 लक्ष निधीतून कोथुर्णे येथे ब्राम्हणोली रस्त्यावर साकव बांधणे, 35 लक्ष निधीतून पाचाणे आगळे वस्ती रस्त्यावर साकव बांधणे, 35 लक्ष निधीतून पाचाणे खिलारेवस्ती रस्त्यावर साकव बांधणे, 35 लक्ष निधीतून बेबडओहोळ ते ठाकर वस्ती रस्त्यावर साकव बांधणे, 60 लक्ष निधीतून शिवली ते येलघोल रस्त्यावर खडकवाडी अशा सहा ठिकाणी साकव पुल बांधण्यात येणार आहेत.

अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार वाड्या – वस्त्यांना गावांशी जोडणारे साकव पूल होणार (Maval) असल्याने स्थानिक ग्रामस्थ,शेतकरी,विद्यार्थी यांची गैरसोय दूर होणार आहे व ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होईल.

साकव बांधणे कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करावा व कामे दर्जेदार करून लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार सुनिल शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.