Chinchwad : उपआयुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त विवेक मुगळीकर, विठ्ठल कुबडे यांची बदली

एमपीसी न्यूज – राज्याच्या गृह विभागाने बुधवारी (दि. 28) राज्य पोलीस सेवेतील(Chinchwad) सहा पोलीस उपायुक्त आणि 14 सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे (Chinchwad)पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर पुणे लोहमार्ग येथील अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली आहे.

Pune: निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन 

 

सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सोलापूर शहर येथे बदली झाली. तसेच डॉ. विवेक मुगळीकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन, जि. रायगड येथे बदली झाली आहे.

 

सोलापूर शहर येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.