Maval : महायुतीचा धर्म पाळणार; श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करणार

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसने केला निर्धार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनांचे पालन (Maval)  करत महायुतीचा धर्म पाळणार असून मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याचे झोकून काम करणार असा निर्धार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची नियोजित बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे,गणेश अप्पा ढोरे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,बाबुराव वायकर,विठ्ठल शिंदे,सुभाषराव जाधव,जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले,गणेश काकडे,संतोष भेगडे,साहेबराव कारके,किशोर सातकर,शिवाजी असवले,मंजुश्री वाघ,दीपाली गराडे, कल्याणी काजळे तसेच मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Today’s Horoscope 05 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या नियोजित बैठकीत जेष्ठ नेते बबनराव भेगडे,गणेश आप्पा ढोरे, बापुसाहेब भेगडे,तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

आमदार सुनील शेळके यावेळी म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे स्वागत करून या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करायचे असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्या अनुषंगाने मावळ तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेण्यात आली.

युतीचा धर्म पाळणे मावळ तालुक्यातील हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्विकारले आहे. मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करणार असल्याचा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त (Maval)  केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.