Bhosari : भोसरीमध्ये कामगारांसाठी कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी महाविद्यालय आणि औदयोगिक आस्थापना यांच्या कराराअंतर्गत कामगारांसाठी कार्यशाळेचे आयोजन नुकतेच भोसरी येथे करण्यात आले. पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन अभियांत्रिकी यांच्या वतीने भोसरी येथील केदार इंडस्ट्रिज मधील कामगारांसाठी ‘आयुष्य सुंदर आहे’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. संस्थेचे करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. 

‘आयुष्य सुंदर असल्याची भावना आपल्यास कायम आनंदी आणि समाधानी ठेवते. दिवसातल्या प्रत्येक क्षणाचा सकारात्मक विनियोग करा, आपली मनोवृत्ती आपल्या जीवनातील सुख ठरवत असते’ असे प्रतिपादन प्रा. नवले यांनी याप्रसंगी केले. व्यायाम, वाचन, डायरी, जनसंपर्क, कला कौशल्य आदींचे जीवनातील महत्त्व त्यांनी यावेळी विशद केले. केदार इंडस्ट्रिजचे सूर्यकांत जाधव, नूतन तंत्रनिकेतनचे प्रा. धनाजी जाधव या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेनंतर उपस्थितांनी मनोगत व्यक्त करून आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.