बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, मटारच्या भावात वाढ

एमपीसी न्यूज – गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा आणि मटारच्या भावात वाढ झाली. तर, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी  दिली. राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या भाजी पाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, इंदौर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून ३ ते ४ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो घेवडा तर मध्य प्रदेशातून  लसणाची १२ ते १३ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ११०० ते १२०० पोती, टोमॅटो सात ते आठ हजार क्रेटस, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, गाजर २०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा ११० ट्रक, आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा ३५ ते ४० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १८०-२२०, बटाटा : २००-२८०. लसूण :१५०-४००, आले सातारी : १५०-४००, भेंडी : २००- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी:२००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : १२०-१६०, वांगी : ३००-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल: ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ४००-४५०, बीट:२६०-३००, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी:२००-२५०, घोसावळे :३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ४५०-५५०, मटार : स्थानिक: १५००-१८००, पावटा : ५००- ६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.