पंढरपूर येथील आश्रमात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार :गुरुवर्य ह भ प शांतीनाथ महाराज

एमपीसी न्यूज :- आळंदी येथे श्री गुरू आदिनाथ वैष्णव योगपीठ सेवा भावी संस्थेची दुसरी पंचवार्षिक अहवाल सभा पार  पडली. कोरोना काळात या संस्थेच्या वार्षिक सभा पार पडल्या नव्हत्या. कोरोना काळानंतर प्रथमच ही सभा आयोजित करण्यात आली होती.
कोरोना काळात ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अश्या नागरिकांना व तसेच वैकुंठवाशी ह. भ.प. शंखनाथ महाराज यांना येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.सामाजीक बांधीलकी जपत कोरोना काळा मध्ये या संस्थेतर्फे एक लाख रुपयांचा (देणगी) धनादेश हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी  म्हणून त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.असे यावेळी ह. भ. प. गुरुवर्य शांतीनाथ महाराज यांनी सांगितले.

पंढरपूर येथील मोठ्या आश्रमात(50 गुंठे असणाऱ्या जागेत)वीज बिल त्यावर खर्च पाहाता,तसेच पुढील दूरदृष्टी चे नियोजन म्हणून तिथे सौरऊर्जा प्रकल्प  उभारण्यात यावा असा प्रस्ताव त्यांनी यावेळी मांडला. या प्रस्तावास सर्व उपस्थितांनी  मंजुरी दिली.पंढरपूर व आळंदीतील आश्रमातील वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक ठरवून त्याचे आर्थिक खर्चाचे व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले.
यावेळी या कार्यकरणी  मंडळाचे अध्यक्ष  ह भ प आनंद महाराज तांबे यांनी सौरऊर्जा प्रकल्पा बाबत माहीत देत व धार्मिक कार्यक्रम अयोजनाबाबत माहिती दिली. शिवाजी सोनवणे यांनी संस्थेच्या भविष्यातील समस्यांवर सेवाभाव वृत्तीने सामोरे जाणेबाबत मार्गदर्शन केले.
बाळासाहेब वाघमोडे,आशाताई वाघमोडे ,रामण्णा नागवडे,शंकर कामथे,दादासो  फराटे ,शशिकांत थोरात, सर्जेराव फराटे  यांनी या संस्थे विषयी असणारे मनोगत व्यक्त केले.या सेवा भावी संस्थेला देणगी दिलेल्या देणगीदारांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ह भ प रंगनाथजी महाराज,वरुणनाथ महाराज,पोपटराव महाडिक,संजय इनामके, बबनराव कांचन,आजचे अन्नदाते सुरेश पाडाळे,विलास चोपडे,भास्कर देशमुख,शरद गिलबिले,राजेंद्र शेलार,बबनराव कांचन,बंडू थोरात,बाळासाहेब जगताप,सत्यवान ताकवणे, पांडुरंग फडके व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.