Dehu : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान

एमपीसी न्यूज : श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी (Dehu) सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10  जूनला होणार असून हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी अजित महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे.

रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13  जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल.

बुधवार 14 जून लोणीकाळभोर, गुरूवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार जून जुन बारामती, सोमवार 19 जून सणसर, मंगळवार 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार 21 जून निमगाव केतकी, गुरूवार 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार 23 जून सराटी, शनिवार 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि (Dehu) रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल.

रविवार 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26  जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.

बुधवार दि.28 जून रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार 29 जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल

Maval : राज्याच्या विकासात मावळचे योगदान महत्त्वाचे – चंद्रशेखर बावनकुळे.

गुरूवार दि. 29 जून ते सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी दुपारपर्यंत  पालखी सोहळा मुक्काम (Dehu) प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. 3 जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरूवात  करेल. पालखी परत येताना १० दिवसांचा प्रवास करून 13 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल.

असा असेल परतीचा प्रवास –

सोमवार 3 जुलै थोरल्या पादुका येथे अभंग आरती होऊन वाखरी येथे मुक्कामी राहिल. मंगळवार 4 जुलै रोजी महाळुंगे, बुधवार 5 जुलै रोजी वडापूरी, गुरूवार 6 जुलै रोजी लासुर्णे, शुक्रवार 7 जुलै रोजी बऱ्हाणपूर, शनिवार 8 जुलै रोजी हिंगणीगाडा, रविवार 9 जुलै वरवंड, सोमवार 10 जुलै उऱूळी कांचन, मंगळावार 11 जुलै रोजी नवी पेठ पुणे, बुधवार 12 जुलैला पिंपरी गाव, गुरूवार 13 जुलैला देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात पालखी विसावेल.


पालखी सोहळा प्रमुख म्हणून भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांची आज निवड करण्यात आली. यंदा प्रथमच व येथून पुढे कायम इंदापूर येथील शाळेतील मुक्कामाच्या ठिकाणात बदल करून हा मुक्काम आयटीआय महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्याच प्रमाणे उरुळी कांचन, भांडगाव, बऱ्हाणपूर येथील दुपारचे विसावे ग्रामस्थ जेथे जागा देतील तेथे रस्ताच्या कडेला राहतील अशी माहिती सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.