Kartiki Ekadashi : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार

एमपीसी न्यूज : पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Ekadashi) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर – पंढरपूर, पंढरपूर – मिरज आणि सोलापूर – पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे –

1. लातूर – पंढरपूर स्पेशल (10 सेवा)

गाडी क्रमांक 01419 विशेष 1, 2, 4, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी लातूर येथून 7.30 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी 12.25 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01420 विशेष पंढरपूर येथून 1, 2, 4, 7 आणि 8 नोव्हेंबर 2022 रोजी पंढरपूर येथून दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी 7.20 वाजता पोहोचेल.

थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.

संरचना: 8 शयनयान आणि 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

2. पंढरपूर – मिरज स्पेशल (8 सेवा) – Kartiki Ekadashi

गाडी क्रमांक 01421 विशेष पंढरपूर येथून 1, 5, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी 9.20 वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी 12.05 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01422 विशेष गाडी मिरज येथून 1, 5, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.10 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी 05.05 वाजता पोहोचेल.

थांबे: सांगोला, वसूड, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सुलगरे आणि आरग.

संरचना: 6 शयनयान आणि 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

3. सोलापूर – पंढरपूर दैनिक डेमू (16 सेवा)

गाडी क्रमांक 01423 डेमू 1 ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत दररोज सोलापूर येथून 10.10 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी 1.00 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01424 डेमू 1 ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत दररोज पंढरपूर येथून 2.40 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी 6.50 वाजता पोहोचेल.

थांबे: बाळे, पाकणी, मुंढेवाडी, मोहोळ, मलिकपेठ, अंगार, वाकाव, माढा, वाडसिंगे, कुर्डुवाडी, मोडलिंब.

संरचना: 10 डेमू कोच.

आरक्षण विशेष गाड्या क्र. 01419/01420 आणि 01421/01422 साठीचे बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर त्वरीत उघडतील.

तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा रेल्वेने सल्ला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.