Alandi : कार्तिकी यात्रेनंतर बेशिस्त पार्किंग व जड वाहनांमुळे आळंदीत वाहतूक कोंडीची समस्या

एमपीसी न्यूज : कार्तिकी यात्रा व संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये (Alandi) पार पडला. त्यानंतर दि.14 व दि.15 डिसेंबर रोजी सलग दोन दिवस आळंदीकरांसह आळंदीतून इतर रहदारी करणाऱ्या अनेक वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा दिवस भरातून बऱ्याच वेळा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.

प्रदीक्षणा रस्ता, वडगांव रस्ता, मरकळ रस्ता इ. ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा दुचाकी चारचाकी वाहने बेशिस्तपणे लागताना दिसून येतातच; त्यात भर म्हणून जड वाहने सुद्धा बंदीच्या वेळेत शहरात प्रवेश करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. जड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शहरात येण्यास बंदी आहे. या नियमाचे पालन करताना ते दिसून येत नाहीत.

Pune : संकल्प यात्रेच्या नावे मोदींची हमी नव्हे जुमलेबाजीच! – मुकुंद किर्दत

तसेच काल एका आळंदीतील सोशल मीडिया ग्रुप वर आळंदीतील वाहतूक कोंडी समस्येबाबत चर्चा रंगली होती. पर्यायी अनेक रस्ते झाले असून सुद्धा त्यासंबंधीची माहिती बाहेरील येणाऱ्या वाहन चालकाला नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे.  पर्यायी (Alandi) रस्त्याचे फलक देखील नाहीत. रस्त्याचे नामनिर्देशित फलक लावणं गरजेचे आहे. असे मत संकेत वाघमारे यांनी मांडले.

वर्तुळाकार वाहतूक करणे, शक्य तिथे लहान पर्यायी रस्ते, बायपास आणि रस्त्यावर उभी राहणारी वाहने यांचा बंदोबस्तसाठी उपाय योजना आणि पदपथ रिकामे असणे गरजेचे यातून बराच फरक पडेल असे मत हेमंत गावडे पाटील यांनी मांडले. आळंदीतील ट्राफिक संबंधी काहीतरी ठोस उपाययोजना व्हायला हवी असे आळंदीकरांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.