India News : पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव

एमपीसी न्यूज – पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव (India News) ओमानच्या आखातात झाला. आएनएस तरकश आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग असलेली हेलिकॉप्टर्स, फ्रेंच राफेल विमाने तसेच युएई नौदल गस्ती विमानांसह या सरावात सहभागी झाले.

दोन दिवसांच्या नियोजित सरावामध्ये नौदलाचा विस्तृत सराव आणि कामकाज झाले. यात पृष्ठभागावरील युद्ध, तोफगोळ्यांचा मारा आणि पृष्ठभागावरील लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रांच्या कवायती, हेलिकॉप्टर क्रॉस डेक लँडिंग ऑपरेशन्स, प्रगत हवाई संरक्षण सराव आणि जहाजावर विमाने उतरवणे आदींचा समावेश आहे. या सरावामध्ये सर्वोत्तम सरावांच्या देवाणघेवाणीसाठी कर्मचार्‍यांचे एकमेकांच्या जहाजांवर जाण्याचा भागही समाविष्ट करण्यात आला.

Balewadi : G.O.D. इंडिया सॉफ्टवेअर सोल्युशन्स तर्फे वृक्षारोपण करत पर्यावरण दिन साजरा

तिन्ही नौदलांमधील त्रिपक्षीय सहकार्य वाढवणे आणि पारंपरिक तसेच अपारंपरिक सागरी धोके दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा करणे हा या पहिल्या सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे या सागरी प्रदेशात (India News) व्यापार सुरक्षितता आणि प्रवास स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य वाढेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.