Pune News : आंतरशालेय हॉकी स्पर्धेत सेंट पॅट्रिक प्रशालेची विजयी सलामी

एमपीसी न्यूज : सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने आजपासून येथे सुरु झालेल्या दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत आपले दोन्ही सामने जिंकून झकास सुरुवात केली.(Pune News) लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटना आणि लॉयला प्रशालेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

नेहरुनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर शुक्रवारपासून सुरु झालेल्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात कर्नल भगत प्रशाला, खडकी आणि मॉडर्न प्रशाला, शिवाजीनगर यांच्यातील 17 वर्षांखालील गटातील सामना गोलशू्न्य बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यात सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने विजय मिळविले.

सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने प्रथम 17 वर्षांखालील गटात कर्नल भगत प्रशाला संघाचा 3-0 असा पराभव केला. आजच्या दिवसातील हा सर्वांत मोठा विजय ठरला.(Pune News) कर्णधार आदित्य दरवडेने 21 आणि 48 व्या मिनिटाला दोन गोल केले. तिसरा गोल रॉन नायडूने 37 व्या मिनिटाला केला.

Pune News : असाही एक डिजिटल दिवाळी अंक…

सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने नंतर 14 वर्षांखालील गटातूनही विजयी सुरुवात करताना दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री संघाचा 2-0 असा पराभव केला.(Pune News) सामन्याच्या सहाव्या मिनिटाला कर्णधारक शशांक गोरेने आघाडी मिळविणारा गोल केला. त्यानंतर शौर्य मेंगे याने 37 व्याम मिनिटाला संघाची आघाडी वाढवणारा गोल केला.

लॉयला प्रशालाचे प्रिन्सिपॉल फादर एस. जे. अनिष यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन जोशी उपस्थित होते.

 

निकाल –

14 वर्षाखालील, गट ब : सेंट पॅट्रिक हायस्कूल: 2 (शशांक गोरे 6 वे; शौर्य मेंगे 37 वे मिनिट) वि.वि. दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री: 0 मध्यंतर 1-0

17 वर्षांखालील गट-ड: कर्नल भगत हायस्कूल 0 अनिर्णित वि.  मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर 0

17 वर्षाखालील, पूल-ड: सेंट पॅट्रिक्स हायस्कूल: 3 (आदित्य दरवडे 31वे, 48 वे; रॉन नायडू 37 वे) वि.वि. कर्नल भगत हायस्कूल: 0. मध्यंतर 0-0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.