Tarak Fateh : जन्माने पाकिस्तानी परंतु, विचाराने भारतीय असलेले पत्रकार तारेक फतेह यांचे निधन

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार तारेक फतेह (Tarak Fateh) यांचे आज कॅनडामध्ये निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरसोबत झुंज देत होते. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली. तारेक फतेह पाकिस्तानी असले तरी नेहमी त्यांनी हिंदुस्थान आणि हिंदू धर्माबाबत ठाम मत घेतले. त्यांच्या अनेक विधानांमुळे ते चर्चेत होते तर काही वेळा त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली. ते स्वत: ला भारतीयच समजत.

त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण 80 च्या दशकापासून ते कॅनडात गेले. ते पाकिस्तानच्या लष्करी आणि कट्टरपंथीयांवर नेहमी टीका करत.

NCP : कार्यकर्त्यांनो गाफील राहू नका – अजित गव्हाणे

तारेक फतेह यांना पाकिस्तानातील कट्टरपंथीयांचा जितका द्वेष होता, तितकेच ते भारतात लोकप्रिय होते. त्यांनी LGBT समाजालाही समर्थन दिले होते. याशिवाय धर्म आणि देश हे एकमेकांपासून वेगळे राहिले पाहिजेत असे त्यांचे मत होते. ते शरिया कायद्याऐवजी पुरोगामी इस्लामबद्दल बोलत असत.

तारेक फतेह स्वतःचे वर्णन पाकिस्तानात जन्मलेले भारतीय असे करायचे. ते पाकिस्तानवर (Tarak Fateh) धार्मिक आणि राजकीय टीका करत असत. भारताची फाळणीही त्यांनी अनेकदा चुकीची सांगितली आहे. त्यांच्या या मतांमुळे अनेकदा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. अशा परखड आणि पुरोगामी पत्रकाराचे आज निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.