Kalapini Diwali Pahat : स्वरदीपांनी उजळली कलापिनीची दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज – सूरांच्या संगतीने कलेचा आनंद घेत दिवाळी साजरी करण्यासाठी, कलापिनी आणि हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरदीप लावू जागी” या दिवाळी पहाटच्या (Kalapini Diwali Pahat) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळी पहाटचे हे २६ वे वर्ष होते. कलापिनीच्या गुणवंत कलाकारांच्या वतीने सुरेल स्वरांचे दीप ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात उजळले.

झाली दिवाळी पहाट, चल जाऊ बिगी बिगी

गाऊ कलापिनीचे रंगी , स्वरदीप लावू जगी……….

या काव्यपंक्तींचा प्रत्यय देणारी शब्द, सूर, तालाने सजलेली दिवाळी पहाट (Kalapini Diwali Pahat) कलापिनी सांस्कृतिक केंद्रात रसिकांनी अनुभवली.

हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक अॅड रवींद्र दाभाडे, अध्यक्ष सुधाकर देशमुख, कैलास भेगडे, देवराम वाघोले, प्रदीप गटे, श्याम इंदोरे. दत्तात्रय कांदळकर व अन्य पदाधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

नटराज अभिवादन गीत आणि मूकनायक या नाटकातील ‘हे प्रभोविभो’ या नाटकातील नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शंकराचार्य रचित कालभैरवाष्टक तसेच लोककलांचा वारसा जपणाऱ्या काकड आरती, वासुदेव या गीतांनी रसिकांची वाहवा मिळवली.

सुहास गाडगीळ यांनी बासरीवर राग पहाडी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पं. विनोद्भूषण आल्पे यांनी सोहनी भटियार रागातील बंदिश आणि ‘सावळे सुंदर’ हा अभंग सादर केला. संपदा थिटे यांनी ‘पतित तू पावना’ हे नाट्यगीत सादर केले.

‘राजाच्या रंगमहाली’, ‘कान्हू घेऊन जाय’, ‘शारद सुंदर’, ‘येशील येशील राणी’(अंकुर शुक्ल), ‘शूर आम्ही सरदार’(विराज सवाई)  ही गीतमाला शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  सादर केली.

लतासप्तकम या परशुराम परांजपे यांनी लिहिलेल्या आणि विनायक लिमये यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनेतून लता दीदींना आदरांजली वाहण्यात आली. मराठी पाउल पडते पुढे आणि कुमारभवनच्या मुलांनी सादर केलेल्या कोकणगाडीने रसिकांची मने जिंकली. सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवीच्या सूरांनी कार्यक्रमाची (Kalapini Diwali Pahat) सांगता झाली.

संपदा थिटे यांनी संगीत संयोजन केले होते. विनायक लिमये, डॉ सावनी परगी, लीना परगी, विराज सवाई, अंकुर शुक्ल, ऋतुजा शेलार, डॉ प्राची पांडे, धनश्री शिंदे, निधी पारेख, चांदणी पांडे यांनी गीते सादर केली. राजेश झिरपे (सिंथेसायझर), मंगेश राजहंस (तबला), सचिन इंगळे (पखवाज), प्रवीण ढवळे, अनिरुद्ध जोशी (तालवाद्य), प्रदीप जोशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

डॉ. विनया केसकर आणि पूजा डोळस यांनी सूत्रसंचालन केले. कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले.

Velha Bull News : दरीत पडलेल्या बैलाला वाचविण्यासाठी शेतकऱ्याचे 25 दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न

योगिता पन्हाळे, आरती पोलावार आणि माधवी एरंडे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कलापिनी महिला मंचाच्या सदस्यांनी स्टेज सजावट केली होती. कुमारभवन. किल्ला आणि फटाक्यांची सजावट लक्ष वेधून घेत होती.

हिंद विजय पतसंस्थेच्या वतीने संपदा थिटे यांचा बालगंधर्व पुरस्कार मिळाल्या बद्दल सन्मानचिन्ह आणि शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

मीनल कुलकर्णी यांनी संयोजन केले. प्रतीक मेहता, शार्दुल गद्रे, स्वच्छंद गंदगे, सायली रौंधळ, सिद्धी शहा, संदीप मन्वरे, रश्मी पांढरे, अनघा बुरसे, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, केतकी लिमये, विद्या अडसुळे, दीपाली जोशी, सुप्रिया खानोलकर आदींनी कार्यक्रमाच्या (Kalapini Diwali Pahat) यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.