Yerwada Murder Case : पूर्वीच्या भांडणातून तरुणाला बोलावून घेत केला खून, दोन तासात आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाला बोलावून घेत त्याचा खून करण्यात आलाय. येरवडा पोलीस स्टेशनच्या (Yerwada Murder Case) हद्दीत हा प्रकार घडला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक केली आहे.

इंजमाम जुबेर इद्रेसी (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शहानवाज शब्बीर शेख याला येरवडा पोलिसांनी (Yerwada Murder Case) अटक केली आहे.

Velha Bull News : दरीत पडलेल्या बैलाला वाचविण्यासाठी शेतकऱ्याचे 25 दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी शहानवाज आणि मयत इंजमाम या दोघात भांडण होते. याच भांडणाच्या रागातून आरोपीने इंजमामला लोहगाव आणि वाघोली परिसरात नेऊन त्याला जबर मारहाण केली.

धारधार शस्त्रानेही त्याच्यावर वार केले. त्यानंतर गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत तसेच सोडून दिले. गंभीर जखम झाल्यामुळे इंजमाम याचा मृत्यू झाला होता.

Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात चार तासांत 17 ठिकाणी आगीच्या घटना

दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि आरोपी शहानवाज याला येरवडा परिसरातीलच (Yerwada Murder Case) इराणी मार्केट जवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली.

तिघांनी मिळून दगड काचेची बाटली आणि बेल्टने मारहाण करत त्याचा खून केला असल्याचे सांगितले. येरवडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.