Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात चार तासांत 17 ठिकाणी आगीच्या घटना

एमपीसी न्यूज – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे शहरात 17 ठिकाणी आगीच्या (Pune Fire News) घटना घडल्या आहेत.

सायंकाळी सहानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. एकापाठोपाठ एक आग लागल्याच्या घटना (Pune Fire News) उघडकीस आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची ही चांगली तारांबळ उडाली होती.

Velha Bull News : दरीत पडलेल्या बैलाला वाचविण्यासाठी शेतकऱ्याचे 25 दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न

सायंकाळी सात नंतर या सर्व घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणालाही गंभीर जखम अथवा जीवितहानी झाली नाही. या आगीचा घटना  (Pune Fire News) कुठे कुठे घडल्या पाहूयात.

1) वेळ 07.55 – जनता वसाहत, गल्ली क्रमांक 47 येथे झाडाला आग

2) वेळ 08.23 – काञज, आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक गॅलरीमधे आग

3) वेळ 08.30 – बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह येथे सोसायटीत आग ( 7 दुचाकी पेटल्या)

4) वेळ 08.44 – नरहे, मानाजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग

5) वेळ 08.48 – विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटलजवळ झाडाला आग

6) वेळ 08.51 – वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग

 7) वेळ 09.16 – सिहंगड रस्ता, शारदा मठाजवळ, श्वेता सोसायटीत नारळाच्या झाडाला आग

8) वेळ 09.40 – गुरुवार पेठ, शितळादेवी चौक जुन्या वाड्यामधे आग

9) वेळ 09.46 – लोहगाव, अंबानगरी, लटेरिया सोसायटीत आग

10) वेळ 09.55 – वडगाव शेरी, टेम्पो चौक झाडाला आग

11) वेळ 10.03 – खडक पोलिस स्टेशन, लाकडी गणपती जवळ गॅलरीमधे आग

12) वेळ 10.29 – औंध, डीपी रस्ता, इंडियन बँकेजवळ, टेरेजा सोसायटी घरामधे आग

13) वेळ 10.31 – सिंहगड रस्ता, संतोष हॉलमागे नारळाच्या झाडाला आग

14) वेळ 10.42 – बालेवाडी, दत्तमंदिरा जवळ एका दुकानामधून धूर

15) वेळ 10.44 – शनिवार पेठ, नाना-नानी पार्क येथे कचऱ्याला आग

16) वेळ 11.44 – भांडारकर इन्स्टीट्यूट जवळ बुलेट गाडीला आग

17) वेळ 11.55 – बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामधे आग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.