Talawade : तळवडे दुर्घटनेतील मृत महिलांची ओळख पटली, ‘ही’ आहेत मृतांची नावे!

एमपीसी न्यूज – तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या आगीत होरपळून सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व मृत महिलांची ओळख पटविण्यात रात्री उशिरा पोलिसांना यश मिळाले.

तळवडे (Talawade) आग दुर्घटनेतील मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1) संगीता देवेंद्र आबदार (वय 28)
2) पूनम अभय मिश्रा (वय 36)
3) लता भारत दंगेकर (वय 40)
4) मंगल बाबासाहेब खरबडे (वय 45)
5) राधा सयाजी गोधडे (वय 18)
6) कमलादेवी सुरज प्रजापती (वय 65)

आगीत होरपळल्यामुळे मृतदेहांची अवस्था फार वाईट झाली होती. दुर्घटनेतील जखमी देखील बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यास विलंब लागला.

Talawade : साहेब… ही माझी बहिण नाही; तळवडे स्पार्कल्स कंपनीतील मयत महिलेच्या भावाचा आक्रोश

या दुर्घटनेत एकूण 10 जण जखमी झाले असून त्यांच्या पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. शिल्पा राठोड (वय-31), प्रतीक्षा तोरणे (वय 16), अपेक्षा तोरणे (वय 26), कविता राठोड (वय 45), रेणुका ताथोड, (वय- 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), सुमन (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (32).

Talawade Fire : तळवडे ज्योतिबानगर येथे फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

तळवडे (Talawade) येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Talawade : तळवडे येथील आगीत दहा जखमी, सहा जणांचा मृत्यू; जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.