Talawade Fire : तळवडे ज्योतिबानगर येथे फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या (Talawade Fire) कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली असून ही कंपनी वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या फायर क्रॅकरची कंपनी होती. यामध्ये 6 महिला कामागारांचा होरपळून मृत्यू झाला तर 9 महिला जखमी झाल्या आहेत.

या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट (Talawade Fire) झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या.

स्फोटाच्या आवाजाने हे शटर बंद झाले आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

जखमींची नावे – 

अपेक्षा अमोल तोरणे (वय 18, अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, रूपीनगर), प्रियंका अमोल यादव (रूपीनगर), उषा सीताराम पाडवी (40 वर्ष), कविता गणेश राठोड (वय 35 वर्ष, रूपीनगर), रेणुका मारुती तातोडे ( वय 20 वर्ष), कमल गणेश चौरे, शरद सुतार

Maharashtra : तुकाराम सुपे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सुमारे 4 कोटींची मालमत्ता जप्त

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वी नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलवले होते. घटनेची (Talawade Fire) माहिती मिळताच महापालिका आयुक्त शिखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.